‘लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे’ – गोपीचंद पडळकर

राज्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले आहे. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीने लागू करा, अन्यथा गाठ धनगरांशी आणि माझ्याशी आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मविआ सरकारला दिला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, आज धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे […]

‘लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे’ – गोपीचंद पडळकर

राज्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले आहे. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीने लागू करा, अन्यथा गाठ धनगरांशी आणि माझ्याशी आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मविआ सरकारला दिला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, आज धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे आजच्याघडीला धनगर समाजाला संघर्ष करावा लागत आहे. आगामी अर्थसंकलपात धनगरांना न्याय देत निधी द्यावा. धनगरांना आश्वासन देऊ नये, अन्यथा अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे धनगरांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा, अन्यथा गाठ ३ कोटी धनगर आणि माझ्याशी आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले की, ‘देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी २२ कल्याणकारी योजना आणि १००० कोटी निधी दिला. प्रस्थापितांच्या सरकारने या योजना गुंडाळल्या आहेत. काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर समाजाचा वापर सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे.’


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number