शिवसेना नेते रामदास कदम नेतेपदाचा राजीनामा देणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. रामदास कदमांच्या निशाण्यावर परिवहन मंत्री अनिल परब, पक्षप्रमुखांवर कारवाई केल्याचा ठपका असून रामदास कदम शिवसेनेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रामदास कदम शिवसेनापद सोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस सरकारच्या वेळी रामदास कदम यांच्याकडे मंत्रीपद होते. मात्र ठाकरे सरकार आल्यानंतर कदम यांच्याकडून मंत्रपद डावलण्यात आले. त्यामुळे कदम शिवसेनेवर नाराज असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे याप्रकरणीच कदम शिवसेनापद सोडणार असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर असताना रामदास कदम यांच्या समर्थकांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे रामदास कदम संतप्त झाले आहेत. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी रामदास कदम यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे रामदास कदम नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.