रामदास कदमांचा स्वत:च्याच मंत्र्याला सवाल, म्हणाले…

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे रामदास कदमांच्या मदतीला धावून आले. रामदास कदम यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला. मात्र विधानभवनात गेल्यानंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याविषयी भाष्य करत नाराजी […]

रामदास कदमांचा स्वत:च्याच मंत्र्याला सवाल, म्हणाले…

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे रामदास कदमांच्या मदतीला धावून आले. रामदास कदम यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला. मात्र विधानभवनात गेल्यानंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याविषयी भाष्य करत नाराजी व्यक्त केली.

विधानभवनात रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांवर निशाणा साधला. मनसेचे वैभव खेडेकर सध्या राष्ट्रवादीसोबत असतात. वैभव खेडेकरांनी बौद्धवाडीसाठी निधी मिळवला. मात्र या निधीतून खेडेकरांनी स्वत:चा बंगला बांधला, असा आरोप रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांवर केला आहे.

वैभव खेडेकर यांच्यावर नगरविकास खात्याने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे खेडेकरसारख्या भ्रष्टाचारी माणसाला पाठिशी का घालण्यात येत आहे? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच खेडेकर यांच्यावर कारवाई केली नाही तर मी सरकारविरोधात न्यायालयात जाईल, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.

याआधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम चर्चेत आहेत. तसेच  आता शिवसेना नेते रामदास कदम यांचा स्वत:च्या मंत्र्यालाच सवाल उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number