केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड विरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण केलं. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील यावेळी उपस्थित होते. कोविड -१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 2-डीजी औषध हा एक नवीन आशेचा किरण आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे कोरोना प्रतिबंधक औषध आहे. काय आहे 2- […]
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड विरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण केलं. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील यावेळी उपस्थित होते.
कोविड -१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 2-डीजी औषध हा एक नवीन आशेचा किरण आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे कोरोना प्रतिबंधक औषध आहे.
काय आहे 2- DG औषध?
2 – DG हे स्वदेशी कोरोना प्रतिबंधक औषध
हे पहिलं औषध जे कोरोना विषाणूचा प्रसार थांबवते.
औषध चूर्ण स्वरूपात असून पाण्यात विरघळून तोंडावाटे घेऊ शकता.
यामुळे, लसीकरणावरील ताण कमी होऊ शकतो. भारताचे चलन वाचू शकते.
2-DG ला लागणारे घटक सहजगत्या उपलब्ध असल्याने मुबलक उत्पादन करणं शक्य
सौम्य आणि मध्यमच नव्हे तर तीव्र स्वरुपाच्या रुग्णांवर देखील वापरता येणार.
हे औषध लक्षण दिसताच अथवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येणार.