महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, जळगावात अवकाळी पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारादेखील देण्यात आला आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य […]

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, जळगावात अवकाळी पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारादेखील देण्यात आला आहे.

हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच उत्तर भारतातील काही भाग सोडला तर अन्य भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.

येवला आणि नाशकात अवकाळी पावसाची हजेरी

येवला आणि नाशकात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागांमध्ये रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच नाशिकमधील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number