Kairichi Dal Recipe : उन्हाळ्यात बनवा सोपी आणि झटपट आंबट गोड कैरीची डाळ

उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. घराघरांत कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात कैरीपासून बनवलेले पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात.

Kairichi Dal Recipe : उन्हाळ्यात बनवा सोपी आणि झटपट आंबट गोड कैरीची डाळ

Raw Mango Dal Recipe : उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. घराघरांत कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात कैरीपासून बनवलेले पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात. कैरीचं पन्ह, चटणी, लोणचं, मुरंबा असे विविध पदार्थ उन्हाळ्यात बनवले जातात. त्यातच आंबट-गोड अशी कैरीची डाळ उन्हाळ्यातील पारंपरिक डिश मानली जाते. आंबट, गोड आणि तिखट चवीचा सुंदर मिश्रण असलेली ही रेसिपी आहे. कमी वेळात होणारी कैरीची डाळ उन्हाळ्यातील मेनूमध्ये एक खास आकर्षण ठरते. जर कधी भाजी काय बनवू हे सुचत नसेल, तर पटकन तुम्ही ही कैरीची डाळ बनवू शकता. पण कैरीची डाळ कशी बनवली जाते हे तुम्हाला माहिती आहे  का? ही डिश झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होऊ शकते. चला तर पाहुयात…

साहित्य: 

  • 1 वाटी चणा/हरभरा डाळ (3-4 तास भिजवलेली) 
  • 1 मध्यम आकाराची कैरी (किसलेली)
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1/2 इंच आल्याचा तुकडा 
  • 2 चमचे किसलेलं खोबरं
  • 1 चमचा साखर किंवा गूळ 
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर 
     

कृती : 

  • 1 वाटी चणा/हरभरा डाळ घ्या. ती 3 ते  4 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.  
  •  भिजवलेली डाळ, हिरवी मिरची, आले आणि मिक्सरमध्ये (जाडसर) वाटून घ्या. वाटताना पाणी वापरू नका. 
  • एका भांड्यात वाटलेली डाळ, किसलेली कैरी, खोबरे, साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व नीट मिक्स करून घ्या.    
  • कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्या. 
  • तयार झालेली फोडणी डाळीच्या मिश्रणावर टाका आणि नीट मिक्स करून घ्या. 
  • अशा प्रकारे तुमची चविष्ट कैरीची डाळ तयार आहे. ही डाळ तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा नुसती ही खाऊ शकता.

काही टिप्स:

1. डाळ वाटताना जाडसर ठेवावी, पेस्ट करू नये.
2. कैरी जास्त आंबट असल्यास त्यात साखर किंवा गुळाचे प्रमाण वाढवावे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number