भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. पी.व्ही.सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. यास्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी ही हिचा तीन गेम्समध्ये २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला.
सिंगापूर ओपन २०२२ च्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूनं अप्रतिम खेळली आहे. सिंधू आणि वँग यांच्यातील हा सामना चांगलाच रंगला होता. तिने पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दुसऱ्या सेटमध्ये चिनच्या वांग झी यीने कडवी झुंज दिली होती . परंतु अंतिम सेटमध्ये सिंधून चांगल्याप्रकारे पुनरागमन करत सिंगापूर ओपनवर आपले नाव कोरले आहे.
पहिल्या गेममध्ये सिंधूने एका पाठोपाठ एक गुण पटकावले आणि वँगला मागे टाकत गेली होती. सिंधूने हा पहिला गेम २१-९ असा सहजपणे जिंकला होता. सिंधूच्या या दमदार खेळीमुळे हा सामना सिंधू सहजपणे जिंके, असे वाटत होते. पण चीनच्या वँगने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये तिने जोरदार पुनरागमन करत सिंधूला कडवी झुंज देण्याता प्रयत्न केला. सिंधूने यावेळी थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिला यावेळी जास्त गुण पटकावता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या गेमममध्ये वँगने २१-११ विजय मिळवला.
वँगच्या या विजयामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत आला होता. त्यामुळे आता तिसरा गेम कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. तिसरा गेम हा दोन्ही खेळाडूंसाठी निर्णयाक ठरणार होता. कारण जो तिसरा गेम जिंकेल त्याला सामन्यासह जेतेपद पटकावता येणार होते. त्यामुळे तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने सर्वस्व पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. सिंधूने यावेळी जोरदार फटके मारले आणि चीनच्या वँगचा पुन्हा एकद पराभव केला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने २१-१५ अशी बाजी मारली.