कर्नाटकात पंतप्रधानांचे सुरक्षा कडे दुसऱ्यांदा भेदले गेले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कर्नाटक दौऱ्यावर असता, हुबळीतील रोड शो दरम्यान एक युवक हार घालण्याचा प्रयत्न करत होता. पंतप्रधानांच्या भोवती त्यांचे सुरक्षारक्षक असतानाही या युवकाने पंतप्रधानांच्या गाडीकडे धावत, पंतप्रधानांना हार घालण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचे कडे भेदले गेले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच या युवकाला रोखल्यामुळे या युवकाचा पंतप्रधानांना हार घालण्याचा प्रयत्न असफल झाला.
पंजाबमध्ये एका सभेसाठी गेले असता पहिल्यांदा पंतप्रधानांचे सुरक्षाकडे भेदले गेले होते. या सभे दरम्यान पंतप्रधानांचे सुरक्षा ओलांडून आंदोलक पंतप्रधानांच्या फार जवळ आले होते त्यामुळे पंजाबात पहिल्यांदा पंतप्रधानांचे सुरक्षा कडे भेदले गेले होते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.