तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाची तयारी शेवटच्या टप्प्यात

पिंपरी, ९ जून, २०२३, प्रतिनिधी : तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. आळंदी येथून ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. १० जून २०२३ म्हणजे माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या फक्त एक दिवस आधी तुकोबांची पालखी देहूमधील ईनामदार साहेब […]

तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाची तयारी शेवटच्या टप्प्यात

पिंपरी, ९ जून, २०२३, प्रतिनिधी :

तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे.

आळंदी येथून ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. १० जून २०२३ म्हणजे माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या फक्त एक दिवस आधी तुकोबांची पालखी देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून प्रस्थान करेल. त्यानंतर आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे प्रवास करत तुकांबाची पालखी वाखरीला पोहोचेल. ही पालखी पंढरपूरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) येथे २८ जून २०२३ रोजी मुक्कामी असेल आणि या पालखीची २९ जून २०२३ रोजी नगर प्रदक्षिणा पार पडेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number