मुंबईत कोरोना लस न घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे तर कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णातही मोठ्या संख्येने वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आढळले असून मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अशातच, मुंबईमध्ये लस न घेतलेल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना लस न […]

मुंबईत कोरोना लस न घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे तर कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णातही मोठ्या संख्येने वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आढळले असून मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अशातच, मुंबईमध्ये लस न घेतलेल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना लस न घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑक्सिजनयुक्त बेडवर असलेल्या १९०० कोरोना रुग्णांपैकी सुमारे ९६ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नाही तर फक्त ४ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे ज्या कोरोना रुग्णांनी याआधी कोरोना लस घेतली नाही, अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

कोरोना लसीकरण न झालेले ऑक्सिजनची गरज भासलेले रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे कोरोनामध्ये या नागरिकांना मोठा धोका असल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूसुद्धा मोठ्या प्रमाणावर श्वसन यंत्रणेवर परिणाम करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number