Asim Munir Pakistan: डॉक्टर गेले, इंजिनिअर गेले… आता हिशोब करायला अकाउंटंटही उरले नाहीत! पाकिस्तानच्या ‘विनाशकालली विपरीत बुद्धी’ची गोष्ट वाचा

पाकिस्तानमध्ये आर्थिक अराजकता आणि राजकीय अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणावर ब्रेन ड्रेन सुरू आहे.

Asim Munir Pakistan: डॉक्टर गेले, इंजिनिअर गेले… आता हिशोब करायला अकाउंटंटही उरले नाहीत! पाकिस्तानच्या ‘विनाशकालली विपरीत बुद्धी’ची गोष्ट वाचा

पाकिस्तानातून सध्या जे काही समोर येत आहे, ते पाहता 'हा देश नेमका चाललाय तरी कुठे?' असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. दहशतवादाची नर्सरी म्हणून ओळखला जाणारा हा देश आता केवळ गरिबांचा नाही, तर त्यांच्याचं देशातील 'बुद्धिवंतांनाही' नकोसा झाला आहे.

पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कधीही न संपणारी राजकीय अस्थिरता यामुळे तिथले उच्चशिक्षित तरुण आता जीव मुठीत धरून परदेशाची वाट धरत आहेत. ज्या देशाला स्वतःचे नागरिक सांभाळता येत नाहीत, तो देश प्रगतीच्या गप्पा कशा मारतो, हाच मोठा विनोद ठरत आहे.

एकीकडे पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याने या महाभयंकर स्थलांतराला 'ब्रेन ड्रेन' म्हणण्याऐवजी 'ब्रेन गेन' म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. त्याच्या मते, लोक देश सोडून जाणे ही सकारात्मक गोष्ट आहे! पण सरकारी आकडेवारीने मुनीर याच्या या हास्यास्पद दाव्याची हवाच काढून टाकली आहे.

गेल्या दोन वर्षांत तब्बल पाच हजार डॉक्टरांनी रुग्णांना त्यांच्या नशिबावर सोडून देश सोडला, 11 हजार इंजिनिअर्सनी आपले कसब परदेशात पणाला लावले, तर 13 हजार अकाउंटंट्सनी पाकिस्तानच्या शून्य असलेल्या तिजोरीचा हिशोब करण्यापेक्षा परदेशी चलन कमवणे पसंत केले आहे.

हेही वाचा: Sandeep Raut : संसदेत संजय, विधानसभेत सुनील अन् आता पालिकेत संदीप; संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत निवडणुकीच्या रिंगणात

पाकिस्तानचा माजी सिनेटर मुस्तफा नवाज खोखर यानी हा अहवाल चव्हाट्यावर आणला असून त्याने सरकारला आरसा दाखवला आहे. "अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर आधी राजकारण सुधारा!" असा टोला त्याने लगावला आहे.

पाकिस्तान हा जगातला चौथा मोठा फ्रीलान्सिंग हब असल्याचा अभिमान सरकार मिरवत होता, पण त्याच सरकारने इंटरनेटवर बंदी घालून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. या इंटरनेट बंदीमुळे पाकिस्तानचे 1.62 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून 20 लाखांहून अधिक फ्रीलान्सर्सवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, पाकिस्तान सध्या अशा वळणावर आहे जिथे ना अर्थव्यवस्था शाबूत आहे ना लोकशाही. ज्या वेगाने तिथले डॉक्टर आणि इंजिनिअर्स देश सोडत आहेत, ते पाहता भविष्यात पाकिस्तानात केवळ लष्करी अधिकारी आणि कर्ज देण्यासाठी कोणी उरेल का, हाच खरा प्रश्न आहे. स्वतःचे घर नीट न सांभाळता शेजारील देशांच्या प्रश्नात नाक खुपसणाऱ्या पाकिस्तानची ही अवस्था म्हणजे 'दुसऱ्याच्या घराकडे पाहता पाहता स्वतःचेच छप्पर उडाले' अशी झाली आहे.

हेही वाचा: Pune Election 2026: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात, सत्ताधारी पक्षाकडून तिकीट; नव्या वादाला ठिणगी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number