पद्मश्री राहीबाईंचा एल्गार

पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचे मूळ गाव असलेल्या कोंभाळणें येथे अवैध दारू व्यवसायाने जोर धरला आहे. यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात एल्गार पुकारला आहे.दारू हे असे व्यसन आहे की त्याच्या आहारी गेलेले पुरुष आपले कुटुंब, समाज, लहान मुले, महिला यांचा कुठलाही विचार […]

पद्मश्री राहीबाईंचा एल्गार

पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचे मूळ गाव असलेल्या कोंभाळणें येथे अवैध दारू व्यवसायाने जोर धरला आहे. यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात एल्गार पुकारला आहे.
दारू हे असे व्यसन आहे की त्याच्या आहारी गेलेले पुरुष आपले कुटुंब, समाज, लहान मुले, महिला यांचा कुठलाही विचार करत नाही. सामाजिक भान गमावून समाजात तसेच कुटुंबात अस्थिरता निर्माण करतात. त्यामुळे हे रोखण्यासाठी कोंभाळणें गावात अनेकदा ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी एकत्र येऊन अवैध दारू व्यवसायाला जोरदार विरोध केला. अनेकदा गावाने ठरावही केले. परंतु मूठभर लोकांनी गावचे प्रयत्न हाणून खुलेआम दारू विक्री सुरू ठेवली होती. ज्यामुळे गावातील तरुण व्यसनाधीन बनत होते. ही गावाची अधोगती पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि गावातील इतर स्त्रियांना सहन झाली नाही. त्यामुळे, हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येत सुमारे दीडशे ते दोनशे महिलांनी अवैध दारू व्यवसायाविरुद्ध एल्गार पुकारला. ज्यांच्या नावाने कुंकू लावायचे तेच व्यसनाने संपणार असतील तर अवैधपणे दारू व्यवसाय करणारे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजे यावर सर्व महिलांचे एकमत झाले. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत दारू व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. सर्व महिलांनी देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकत त्यांचा चुराडा केला. यापुढे गावात दारू विक्री करताना दिसल्यास महिला ते सहन करणार नाहीत हे ठोसपणे सांगितले. यावरून स्त्री शक्ती काय करू शकते प्रचिती येत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number