Hair Mask At Home: केसांचा ऑयली आणि चिकट लूक हा अनेकांच्या दैनंदिन रुटीनचा त्रासदायक हिस्सा असतो. केस दोन दिवसही व्यवस्थित टिकत नाहीत, शँपू करूनही दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेलकटपणा जाणवतो आणि मग केस मोकळे ठेवणं म्हणजे पूर्ण कॉन्फिडन्सला धक्का असं वाटू लागतं. खरं पाहिलं तर, यामागे फक्त हवामान किंवा प्रदूषण कारणीभूत नसतं; टाळूची सतत होणारी ऑईल-प्रॉडक्शन बाहेरून धुण्याने पूर्णपणे कंट्रोल होत नाही. म्हणून अनेक तज्ज्ञ 'रूट लेव्हल केअर' करण्यावर जोर देतात.
यासाठी घरच्या नैसर्गिक वस्तूंचा वापर हा उत्तम आणि साइड-इफेक्ट फ्री पर्याय ठरतो. कारण नैसर्गिक पद्धतीने टाळू स्वच्छ केला की केसांना ताजेतवाने दिसणारी चमक टिकते आणि ऑयलीपणा कमी होतो. घरीच सहज मिळणाऱ्या काही वस्तू वापरून तयार केलेले मास्क केसांना पोषण देतात, ओलावा राखतात आणि जादा तेल काढून टाकतात. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी केमिकल्सचा बेस न वापरता फक्त स्वच्छ मिसळलेले बेसिक घटक वापरले जातात.
हेही वाचा:Winter Beauty Care: हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी 'हे' लिप स्क्रब नक्की करा
पहिला सोपा पर्याय म्हणजे दही आणि लिंबू बेस्ड मास्क. घरी वापरलं जाणारं साधं दही केसांसाठी ‘कूलिंग ट्रीटमेंट’ सारखं काम करतं. ते टाळू शांत ठेवतं, जमा झालेला बिल्डअप सहज सैल करतो आणि रूट ओपन होण्यास मदत करतो. त्यात एक चमचा लिंबाचा रस घातल्यास टाळूवरचा तेलकटपणा साफ होण्यास मदत होते. हे मिश्रण संपूर्ण केसांवर लावून वीस ते तीस मिनिटं ठेवावं आणि नंतर mild शँपूने धुवावं. नियमित वापरानं केस हलके दिसतात, ‘weighed down look’ कमी होतो.
दुसरा प्रभावी पर्याय multigrain बेस. बाजारात मिळणारी multi-flour पावडर (ज्यात बाजरी, हरभरा, बार्ली यांचं मिश्रण असतं) केसांमध्ये नैसर्गिक क्लेन्सर सारखं काम करतं. हे टाळूवरील घाण आणि ऑयली लेअर लवकर संपवते. या पीठात दही घालून पेस्ट बनवता येते. थोडं लिंबू मिसळल्यास मास्कची deep cleaning क्षमता वाढते. हा मास्कही त्याच पद्धतीनं वापरायचा पेस्ट लावून 20-25 मिनिटं ठेवायची आणि नंतर धुवायची.
हे दोन्ही मास्कचा खरा फायदा राहतो:
रूट फ्रेश + लाइट वेट फील
आणि नेहमीसारखी चिकट लेयर परत जड वाटत नाही.
घरी उपचार करताना काही छोटी काळजी घेतली तर फायदा दुप्पट होऊ शकतो:
खूप गरम पाणी वापरू नका
नेहमी mild शँपूच वापरा
hair serum हे रूट नव्हे तर फक्त lengths ला लावा
आठवड्यातून एकच deep mask पुरेसा
या सगळ्याचा परिणाम असा की केसांची टेक्स्चर हळूहळू बदलते, टाळूचं नैसर्गिक संतुलन ठीक राहतं. आणि सर्वात महत्वाचं केमिकल्सचा ओव्हरलोड टाळता येतो.