‘सबळ पुरावे नसताना नोटीस’

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणं आशिष देशमुख यांना चांगलंच भोवलं असून अखेर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीने देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले आहे. आशिष देशमुख यांनी मागील दिवसांत नाना पटोले यांच्यावर गंभीर आऱोप करत राज्याच्या राजकारणात एकच […]

‘सबळ पुरावे नसताना नोटीस’

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणं आशिष देशमुख यांना चांगलंच भोवलं असून अखेर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीने देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले आहे.

आशिष देशमुख यांनी मागील दिवसांत नाना पटोले यांच्यावर गंभीर आऱोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.मात्र, काँग्रेसपक्षाच्या शिस्तपालन समितीनं अखेर देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी आशिष देशमुखयांनी मी पक्ष आणि कार्यकर्त्यांसह एकूणच ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे असा आरोप केला आहे. तसेच माझ्या विरोधातील मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे आणि नेत्यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न विचारण्याचे माझे धाडस हे त्याचे कारण आहे. मला नोटीस बजावून, प्रदेश कॉंग्रेसने आपल्याच लोकशाहीवादी परंपरेचा अपमान केला आहे. पण मी निश्चिंत आणि निश्चयी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं असा इशाराही दिला आहे.

कोणतेही सबळ कारण नसताना मला कारणे दाखवा नोटीस बजावली ही दुर्दैवाची बाब आहे. मला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये दोन मुद्दे आहेत. पहिली गोष्ट राहुल गांधी यांनी देशभरातील ओबीसी समाजाची माफी मागावी असे मी सुचवले होते. योग्य निष्कर्ष काढण्यासाठी हा विषय संदर्भासह समजून घेणे आवश्यक आहे. राहुलजींचे ‘मोदी’ आडनाव असलेल्या व्यक्तींचा संदर्भ देणारे विधान, त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची शिक्षा आणि त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येणे हा त्याचा मूळ संदर्भ आहे असंही देशमुख म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number