अहमदनगरमध्ये एसटीचे नऊ आगार सुरू

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहेत तर काही प्रवासी पायपीट करत अंतर गाठत आहे. दरम्यान अहमदनगरमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये एसटी बसचे नऊ आगार सुरू झाले आहेत. अहमदनगरमधील एकूण ३८०० एसटी कर्मचाऱ्यांपैकी १२०० कर्मचारी पुन्हा कामावर रुजू […]

अहमदनगरमध्ये एसटीचे नऊ आगार सुरू

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहेत तर काही प्रवासी पायपीट करत अंतर गाठत आहे. दरम्यान अहमदनगरमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये एसटी बसचे नऊ आगार सुरू झाले आहेत.

अहमदनगरमधील एकूण ३८०० एसटी कर्मचाऱ्यांपैकी १२०० कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले असून आता नगरमधील एसटीचे नऊ आगार सुरू झाले आहेत. दरम्यान वारंवार आवाहन करूनही कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान जिल्ह्यातील २९० कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे तर २७ संपकारी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात १२० फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी नियंत्रक विभागाने दिली आहे.

नागपूरमध्ये १५ कर्मचारी कामावर रुजू

नागपूर एसटी महामंडळाकडून १५ संपकारी एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ११६ संपकारी एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. तर एसटी महामंडळाकडून १३ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूर विभागातील बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या १२१ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number