इंधन दरवाढीविरोधात नाशकात राष्ट्रवादी युवक आक्रमक

गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक आक्रमक झाले आहेत. इंधनाच्या दरवाढी विरोधात नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी नाशिकच्या विनय नगर येथील पेट्रोल पंपावर ‘एप्रिल फुल’ आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या युवकांनी ‘कमल का फुल एप्रिल फुल’ अशा घोषणा करत युवकांनी आंदोलन केले. यावेळी, पंतप्रधान मोदींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल […]

इंधन दरवाढीविरोधात नाशकात राष्ट्रवादी युवक आक्रमक

गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक आक्रमक झाले आहेत. इंधनाच्या दरवाढी विरोधात नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी नाशिकच्या विनय नगर येथील पेट्रोल पंपावर ‘एप्रिल फुल’ आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या युवकांनी ‘कमल का फुल एप्रिल फुल’ अशा घोषणा करत युवकांनी आंदोलन केले.

यावेळी, पंतप्रधान मोदींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस असा पंतप्रधान मोदी यांचा फोटो असलेला प्रतिकात्मक केक हा गाजरांनी कापून हे आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्याचे आश्वासन देत पंतप्रधानानी भारताच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. महागाईने देशातील जनता ही होरपळली असून पंतप्रधानांनी देशातील जनतेचा एप्रिल फुल केल्याचे देखील यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत होते. परंतु, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जारी केल्या इंधनाच्या दरानुसार, पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number