क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे यांच्यावरील ट्विटची मालिका सुरूच आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी, म्हणजेच क्रांती रेडकरची बहिण हर्षदा रेडकरवर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिकांनी ट्विट करत याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत का? असा प्रश्न मलिकांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. तसेच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, कारण या प्रकरणाबाबतचा खटला पुण्यातील न्यायालयात प्रलंबित आहे. खालील कागदपत्रे हे त्याचा पुरावा आहे. असे लिहीत त्यांनी याप्रकरणाचे पुरावे सादर केले आहेत.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
मलिकांनी कागदपत्रे सादर करत हषर्दा रेडकर यांच्यावर पुण्यातील न्यायालयात खटला सुरू असल्याचा दावा केला आहे. या ड्रग्जप्रकरणाचे मास्टरमाईंड भाजप नेते मोहित कम्बोज असल्याचा मलिकांनी सांगितले. तसेच ते समीर वानखेडे हे मोहित कम्बोज यांचे घनिष्ट मित्र असल्यामुळे त्यांचे नाव या प्रकरणात नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मलिकांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर केलेल्या आरोपामुळे नव्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.