नवाब मलिक पत्रकार परिषद : मलिकांचे फडणवीसांवर आरोप

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. यावर नवाब मलिकांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या काळात फडणवीसांनी बनावट नोटांचा खेळ सुरू केल्याचा दावा मलिकांनी केला आहे.   ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. नोटाबंदी जाहीर केल्यामुळे देशात […]

नवाब मलिक पत्रकार परिषद : मलिकांचे फडणवीसांवर आरोप

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. यावर नवाब मलिकांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या काळात फडणवीसांनी बनावट नोटांचा खेळ सुरू केल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

  ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. नोटाबंदी जाहीर केल्यामुळे देशात अनेक बनावट नोटा सापडल्या. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीमध्ये छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये १४ कोटी ५६ लाखाच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र यातून केवळ ८ लाख ८० हजार बनावट नोटा फडणवीसांनी समोर आणल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटींचे प्रकरण दाबले. त्यामुळे बनावट नोटांच्या रॅकेटला देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा असल्याचा आरोप नवाब मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.

  बनावट नोटांचे नेक्सस दाऊद, बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत होते. फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुडांना मोठ्या पदावर बसवल्याचा आरोपही मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number