नारायण राणेंची केंद्रात वर्णी

खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी निश्चित झाली असून ८ जुलै रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी खासदार नारायण राणे हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दिल्लीतील कार्यालयातून ५ जुलै रोजी फोन आला होता. त्याचवेळी नारायण राणे यांची केंद्रीय […]

नारायण राणेंची केंद्रात वर्णी

खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी निश्चित झाली असून ८ जुलै रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी खासदार नारायण राणे हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दिल्लीतील कार्यालयातून ५ जुलै रोजी फोन आला होता. त्याचवेळी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागल्याची निश्चिती झाली होती. दरम्यान आज सकाळी नारायण राणे पत्नी नीलम यांच्यासह गोव्याला रवाना झाले असून दुपारी दीड च्या सुमारास मुंबईतुन विमानाने ने ते सपत्नीक दिल्लीला रवाना झाले आहेत. तर खासदार निलेश राणे हे मुंबईतून आज दिल्लीला रवाना होणार आहेत. आमदार नितेश राणे हेही पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुंबईतून दिल्लीला रवाना होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number