Nanital Car Accident: नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला! 60 मीटर दरीत कोसळली कार; नैनितालमधील दुर्दैवी घटना

वळणदार रस्ता आणि अंधारामुळे कारचा ताबा सुटल्याचा अंदाज आहे. एसडीआरएफने आव्हानात्मक परिस्थितीत बचावकार्य करून जखमीला रुग्णालयात हलवले.

Nanital Car Accident: नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला! 60 मीटर दरीत कोसळली कार; नैनितालमधील दुर्दैवी घटना

उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील कँचीधाम परिसरात शनिवारी दुपारी मोठा अपघात झाला. एका कारचा ताबा सुटून ती सुमारे 60 मीटर खोल दरीत कोसळली, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सर्वजण अल्मोडा येथील असून हल्द्वानीमध्ये होणाऱ्या एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF) पथकाने त्वरित बचाव मोहिम सुरू केली. शनिवार उशिरा अल्मोडा हल्द्वानी महामार्गावर खैरना जवळील रातीघाट येथे ही दुर्घटना घडली.

कारमध्ये चार शिक्षक प्रवास करत होते. वळणदार रस्ता आणि अंधारामुळे कारचा ताबा सुटल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. कार कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर जवळील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर खैरना पोलिस चौकीचे कर्मचारी आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. दरी अत्यंत खोल आणि परिसर खडकाळ असल्याने बचावकार्य कठीण होते. तरीही एसडीआरएफच्या जवानांनी रस्स्या आणि विशेष साधनांच्या मदतीने जखमी आणि मृतांना बाहेर काढले. खाली पडलेली कार महिंद्रा XUV500 असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: PF Update: EPFO वेतन मर्यादा वाढणार! 1 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा, जाणून घ्या

अपघातात मृत झालेले तिन्ही शिक्षक होते या मध्ये संजय बिष्ट (अल्मोडा), सुरेंद्र भंडारी (अल्मोडा), पुष्कर भैसोड़ा (अल्मोडा) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी शिक्षक मनोज कुमार (अल्मोडा) यांना प्रथम उपचार करून हल्द्वानीतील उच्च उपचार केंद्रात हलवण्यात आले आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नैनीताल परिसरात डोंगराळ रस्ते, घसरणारे वळण आणि अंधारामुळे अशा अपघातांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढताना दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Diesel Auto Ban: नोएडा-गाझियाबादमध्ये डिझेल ऑटोवर बंदी; प्रदूषण नियंत्रणासाठी यूपी सरकारची मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number