कॅप्टन कूलच्या घरी आला नवा पाहुणा…मुलगी झिवासोबत इन्टाग्रामवर फोटो व्हायरल …

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पिंपरी चिंचवड घराची चर्चा सोशल मीडियावर होत असताना आता आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. कॅप्टन कूलच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सध्याला धोनीच्या मुलीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झिवाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो महेंद्रसिंह धोनीच्या रांची […]

कॅप्टन कूलच्या घरी आला नवा पाहुणा…मुलगी झिवासोबत इन्टाग्रामवर फोटो व्हायरल …

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पिंपरी चिंचवड घराची चर्चा सोशल मीडियावर होत असताना आता आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. कॅप्टन कूलच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सध्याला धोनीच्या मुलीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झिवाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो महेंद्रसिंह धोनीच्या रांची इथल्या फार्म हाऊसवर असून चेतकसोबत आता आणखी एक नवा पाहुणा आला असं दिसत आहे. धोनीने आपल्या मुलीला एक घोडा भेट दिला आहे. या घोड्याचा रंग हा पांढरा शुभ्र आहे. तसेच डौलदार असलेला हा घोडा धोनीने खास स्कॉटलंडवरून मागवला आहे. त्याचं वय 2 वर्ष आणि उंची साधारण 3 फूट आहे. हा घोडा आपल्या वेगासाठी नाही तर सौंदर्यासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. IPL 2021 चे सामने कोरोनामुळे 4 मे रोजी स्थगित झाल्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासोबत रांचीमध्ये वेळ घालवत आहे. तसेच धोनी हा पत्नी साक्षीबरोबर प्राण्यांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच चेतक घोड्याच्या अंगावरून हात फिरवतानाचा धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. UAE मध्ये IPL 2021चे उर्वरित 31 सामने होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व खेळाडू आता IPLच्या उर्वरित सामन्यांच्या तयारीला हळूहळू सुरुवात करतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number