IPL Seasons A to Z Story : सलग 18 ब्लॉकबस्टर सिजन्सचा थरार; टॅलेंटेड खेळाडूंना Exposure ते क्रिकेटप्रेमींचं तुफान मनोरंजन

आयपीएल फक्त 10 संघांमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा नाहीये, आयपीएलमध्ये खेळाडूंचीच नव्हे तर BCCI पासून अनेक उद्योजकांची आर्थिक गणितं बदलली.

IPL Seasons A to Z Story : सलग 18 ब्लॉकबस्टर सिजन्सचा थरार; टॅलेंटेड खेळाडूंना Exposure ते क्रिकेटप्रेमींचं तुफान मनोरंजन

आयपीएलचा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होतोय. क्रिकेट रसिकांसाठी आयपीएल एका सणासारखेच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपल्या आवडत्या संघाचे सामने बघणे, आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देणे, दोन महिन्यासाठी चाहत्यांचा एक डोळा आयपीएलच्या वेळापत्रकांवर असतो तर एक 'Points Table' वर असतो. त्याचबरोबर दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना डिवचण्यातदेखील एक वेगळीच मजा आहे. आजच्या डिजिटल काळात आयपीएलचे 'मिम्स' बनवून किंवा शेअर करून दुसऱ्या संघाला किंवा दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना  डिवचणदेखील तेवढ्याच जोमाने केलं जातं. 

आयपीएल फक्त 10 संघांमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा नाहीये, आयपीएलमध्ये खेळाडूंचीच नव्हे तर BCCI पासून अनेक उद्योजकांची आर्थिक गणितं बदलली. जसं आयपीएलचं यश वाढत गेलं त्याच गतीने BCCI चं जागतिक क्रिकेटमधील महत्व वाढत गेलं. BCCI ला जगातला श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यात आयपीएलचा सिंहाचा वाटा आहे. आयपीएलमुळे पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वी जैसवालला, घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याचा मुलगा रिंकू सिंह किंवा 40 वर्षापर्यंत फक्त क्लब क्रिकेट खेळणाऱ्या प्रवीण तांबेला करोडपती बनण्याची संधी आयपीएलने  दिली. आयपीएलमध्ये 15  वर्षांच्या वैभव सूर्यवंशीलादेखील आणि 44 वर्षांच्या महेंद्र सिंह धोनीसाठीदेखील जागा आहे. आयपीएल म्हटलं की आपल्यासमोर पैसा किंवा ग्लॅमर येतं पण टॅलेंटला संधीदेखील आयपीएलमुळे मिळते. आयपीएलमुळे भारतालाच नव्हे तर इतर देशांनादेखील स्टार खेळाडू मिळाले आहेत.

हेही वाचा : IPL 2026 Schedule: आयपीएल 2026 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार उर्वरित 50 सामन्यांचा थरार

आयपीएल 2026बद्दल बोलायला गेलं, तर यंदाचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या दोन संघांमध्ये होणार आहे. 2017 च्या हंगामाचादेखील पहिला सामना यादोन्ही संघांमध्ये खेळाला गेला होता. तब्बल नऊ वर्षांनी हे दोन्ही संघ आयपीएलचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आयपीएल 2026 च्या लिलावानंतर सर्व संघ बलाढ्य दिसत आहेत, पण कागदावर बलाढ्य दिसणं आणि मैदानात उत्कृष्ट कामगिरी करणं या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी ठरतात. प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. प्रत्येक  संघ 7 सामने घरच्या मैदानात तर 7 सामने बाहेर खेळणार. मोजके संघ त्यांचे 7 घरचे सामने 2 वेगवेगळ्या मैदनातदेखील खेळताना दिसणार, बंगळुरू त्यांचे 5 सामने बंगळुरूमध्ये खेळणार, तर 2 सामने रायपूरमध्ये खेळणार, पंजाब त्यांचे 5 सामने चंदीगडमध्ये खेळणार, तर 2 सामने हिमाचलच्या HPCA मैदान खेळणार आहे तर राजस्थान रॉयल्स 4 सामने जयपूरमध्ये, तर 3 सामने गुवाहाटीत खेळताना दिसतील. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ट्रॉफीचा दुष्काळ तर संपला, पण आयपीएलमधल्या 10 संघांपैकी 3 संघांना अजूनही यश चाखता आलेलं नाही. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सपैकी एका संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार की उरलेल्या सात संघापैकी एक संघ पुन्हा ट्रॉफी उचलेल हे नक्की बघण्यायोग्य असेल. 

आयपीएल सुरु होण्यापूर्वी चाहत्यांसमोर बरेच प्रश्न आहेत. महेंद्र सिंग धोनी या आयपीएलनंतर निवृत्ती घेणार की धोनी पुन्हा एकदा निवृत्तीच्या प्रश्नांना बगल देऊन 'डेफिनेटली नॉट' म्हणत अजून एक हंगाम खेळेल याकडे सर्वांचंच लक्ष राहील. अजून दोन प्रश्न जे प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या मनात असतील ते  म्हणजे विराट कोहली त्याचं एका हंगामात सर्वाधिक धावा (973 धावा) करण्याचं रेकॉर्ड तोडेल का  ? की रोहित शर्मा निवृत्त होण्याआधी एकदा तरी ऑरेंज कॅप पटकावले का ? या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना मिळतील अशी अपेक्षा असेल. 

हेही वाचा : IPL 2026: यंदा आयपीएलचा 'ग्लॅमरस' उद्घाटन सोहळा नसणार? 'हे' कारण आलं समोर

आयपीएल (IPL) मधील काही महत्त्वाचे आणि ऐतिहासिक विक्रम –

1. सर्वाधिक धावा (Most Runs)

आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

एकूण धावा: 8,661

विशेष विक्रम: एकाच हंगामात (2016) सर्वाधिक 973 धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

2. सर्वाधिक बळी (Most Wickets)

भारताचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

एकूण बळी: 220 

200 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

3. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (Highest Individual Score)

एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे.

धावा: 175* (66 चेंडूत)

विरुद्ध: पुणे वॉरियर्स इंडिया (2013)

4. सर्वात जलद शतक आणि अर्धशतक (Fastest 100 & 50)

जलद शतक: ख्रिस गेल (30 चेंडूत).

जलद अर्धशतक: यशस्वी जयस्वाल (13 चेंडूत).

5. सर्वाधिक विजेतेपदे

आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावले आहे.

मुंबई इंडियन्स: 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019, 2020)

चेन्नई सुपर किंग्ज: 5 वेळा (2010, 2011, 2018, 2021, 2023)

इतर काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स –

सर्वोच्च सांघिक धावसंख्या: सनरायझर्स हैदराबाद (287/3 विरुद्ध आरसीबी, 2024)

सर्वात कमी  सांघिक धावसंख्या:49 (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

सर्वोत्तम गोलंदाजी: अल्झारी जोसेफ (12 धावांत 6 बळी)

सर्वाधिक षटकार: ख्रिस गेल (357)

सर्वाधिक चौकार: विराट कोहली (771)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number