आमदार रवी राणा आंदोलनावर ठाम

आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, रवी राणा आंदोलनावर ठाम असून मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठणाचा दिवस घोषित करण्यात आला असून २२ एप्रिल रोजी रवी राणा मतोश्रीसमोर जाणार आहेत. राज्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय तसेच हिंदुत्वाचा विषया चांगलाच तापला आहे. तर राज ठाकेरंनी […]

आमदार रवी राणा आंदोलनावर ठाम

आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, रवी राणा आंदोलनावर ठाम असून मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठणाचा दिवस घोषित करण्यात आला असून २२ एप्रिल रोजी रवी राणा मतोश्रीसमोर जाणार आहेत.

राज्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय तसेच हिंदुत्वाचा विषया चांगलाच तापला आहे. तर राज ठाकेरंनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली असून भाजपाचा त्यांना पाठिंबा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप तसेच अस्थिरता माजली आहे. त्यामुळे या सर्वातून मुक्त करण्यासाठी रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान पठण करणार आहेत.

‘मातोश्रीसमोर हनुमान पठण केल्याने खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार खोलवर रुजतील. राज्य सध्या संकटाता आहे, त्यासाठी हे होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. तसेच विरोध करणाऱ्यांना माझी विनंती आहे की राज्याच्या उन्नतीसाठी हनुमान चालीसा वाचवण्यासाठी ही काळाची गरज आहे,’ असेही राणा म्हणाले.

आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हुनमान चालीसा पठण करणार असल्यावर ठाम आहेत. तर या आंदोलनाला शिवसेनेचा कठोर विरोधाचा इशारा आहे. राणांना मातोश्रीवर येणे सोपं नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number