हट्ट पोलीस हटवण्याचा

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘दहा मिनिटे पोलीस हटवा, हिंदू ओवैसीला धडा शिकवतील’ असे वक्तव्य, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. मात्र, पोलीस हटवण्याचे मूळ वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनीच केले असून वाद जन्माला घातला होता. अकबरुद्दीन ओवैसी यांनी […]

हट्ट पोलीस हटवण्याचा

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘दहा मिनिटे पोलीस हटवा, हिंदू ओवैसीला धडा शिकवतील’ असे वक्तव्य, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. मात्र, पोलीस हटवण्याचे मूळ वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनीच केले असून वाद जन्माला घातला होता.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी पोलीस हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी १५ मिनिटे पोलीस हटवा भारतातले मुसलमान हिंदूंना धडा शिकवतील अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता मोहित कंबोज यांनी त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेऊन दहा मिनिटे पोलीस हटवा, हिंदू ओवैसीला धडा शिकवतील, असे वक्तव्य केले आहे.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी दुपारी खुलाताबाद येथील हजरत सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जाऊन दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्गेत गेल्यानंतर अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीस्थळी पोहचले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी अनेक दर्गांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत इम्तीयाज जलील, वारीस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजप नेते राम कदम यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता ओवैसी यांच्यावर कारवाई होणार का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number