Most Expensive Mango: हापूस किंवा केसर नाही, तर ‘हा’ आहे सर्वात महागडा आंबा; चवीला साखरेपेक्षाही गोड, पण किंमत ऐकून चक्रावून जाल

जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा साखरेपेक्षाही गोड असून त्याची किंमत लाखोंमध्ये आहे, जपानमध्ये पिकणाऱ्या या आंब्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Most Expensive Mango: हापूस किंवा केसर नाही, तर ‘हा’ आहे सर्वात महागडा आंबा; चवीला साखरेपेक्षाही गोड, पण किंमत ऐकून चक्रावून जाल

miyazaki mango price: उन्हाळा आला की आंब्यांचा सुगंध आणि चव यामुळे बाजारपेठा रंगून जातात. भारतात आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हणून ओळख मिळाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल? हा आहे मियाझाकी आंबा—जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जाणारा.

हा खास आंबा जपानमधील मियाझाकी प्रांत येथे पिकवला जातो. इथल्या हवामानामुळे आणि अत्यंत नियंत्रित शेती पद्धतीमुळे या आंब्याला विशेष दर्जा मिळतो. प्रत्येक फळाची काळजी घेताना तापमान, सूर्यप्रकाश आणि पाण्याचे अचूक नियोजन केले जाते. त्यामुळेच या आंब्याची गुणवत्ता आणि चव इतरांपेक्षा खूप वेगळी असते.

मियाझाकी आंब्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकर्षक रंग आणि अप्रतिम गोडवा. साधारण आंबे पिवळे किंवा हिरवे असतात, पण हा आंबा गडद लाल रंगाचा असतो. त्याची चव इतकी गोड असते की, अनेकजण ती साखरेपेक्षाही गोड असल्याचं सांगतात. मऊसर आणि रसाळ पोत यामुळे हा आंबा खाण्याचा अनुभव खास बनतो. याच्या आकारामुळे आणि रंगामुळे जपानमध्ये याला ‘एग ऑफ द सन’ असंही नाव दिलं गेलं आहे.

या आंब्याची किंमतच त्याला सर्वाधिक चर्चेत ठेवते. मियाझाकी आंबा प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत विकला जातो. एवढ्या किमतीत भारतात एक चांगली दुचाकी किंवा सेकंड-हँड कार खरेदी करता येते. त्यामुळे हा आंबा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. हा आंबा बाजारात सहज उपलब्ध नसतो, तर खास लिलावांमध्ये विकला जातो, जिथे श्रीमंत ग्राहक मोठ्या किंमतीत त्याची खरेदी करतात.

गेल्या काही वर्षांत भारतातही या आंब्याची लागवड सुरू झाली आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये प्रयोगात्मक पद्धतीने या आंब्याची शेती केली जात आहे. मात्र, जपानसारखी गुणवत्ता आणि किंमत मिळवण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

एकूणच, मियाझाकी आंबा हा केवळ एक फळ नसून लक्झरीचं प्रतीक बनला आहे. त्याची चव, रंग आणि किंमत या तिन्ही गोष्टी त्याला जगभरात वेगळं स्थान देतात. त्यामुळेच हा आंबा आज ‘फळांचा राजा’ या संकल्पनेलाही नवी उंची देताना दिसतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number