Migraine Control Tips: अपुरी झोप आणि स्क्रीन टाइमचा अतिवापर बेतू शकतो जिवावर! मायग्रेनपासून करा सुटका, जीवनशैलीत करा ‘हे’ महत्त्वाचे बदल

मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसून एक गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या आहे. अपुरी झोप, तणाव, कॅफिन, प्रखर उजेड आणि मोठा आवाज यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

Migraine Control Tips: अपुरी झोप आणि स्क्रीन टाइमचा अतिवापर बेतू शकतो जिवावर! मायग्रेनपासून करा सुटका, जीवनशैलीत करा ‘हे’ महत्त्वाचे बदल

मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एका भागात सुई टोचल्यासारखा किंवा ठणकणाऱ्या तीव्र वेदना होणे. काही लोकांना डोक्याच्या अर्ध्या भागात प्रचंड दुखणे जाणवते. हा त्रास काही तासांपासून काही दिवसांपर्यंत टिकू शकतो. मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसून एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. यात मळमळ, उलटी, जास्त प्रकाशाचा त्रास, मोठ्या आवाजाने अस्वस्थता, डोळ्यांसमोर चमकणे किंवा धूसर दिसणे, डोक्यात झिणझिण्या येणे आणि बोलण्यात अडचण येणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

मायग्रेन महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत मायग्रेनचा धोका अधिक असतो. विशेषतः 15 ते 55 वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. तणाव, अपुरी झोप, हार्मोनल बदल, प्रकाश, मोठा आवाज, चॉकलेट, वाइन आणि चुकीची जीवनशैली यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे मायग्रेनची समस्या अधिक वाढू शकते.

मायग्रेन असलेल्या व्यक्तींनी सर्वात आधी झोपेची काळजी घ्यावी. अपुरी झोप ही मायग्रेन वाढवणारी सर्वात मोठी चूक मानली जाते. सतत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरण्यामुळे झोपेची वेळ बिघडते आणि मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: QR Code Technology: प्रवास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट' कवच! भारतीय विद्यार्थ्याने बनवला पोलिसांना 'लाईव्ह लोकेशन' पाठवणारा QR कोड

मोठ्या आवाजापासूनही दूर राहणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजातील संगीत ऐकणे, सतत गोंगाटात राहणे किंवा आवाजाच्या वातावरणात वेळ घालवणे यामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. त्यामुळे शांत ठिकाणी काही वेळ घालवल्यास मेंदू शांत राहतो आणि तणाव कमी होतो.

याशिवाय, जास्त वेळ उपाशी राहणेही मायग्रेन वाढवू शकते. आजकाल अनेक लोक डाएट किंवा वजन कमी करण्यासाठी बराच वेळ काही खात नाहीत. त्यामुळे शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो.

जास्त कॅफिन असलेले पदार्थ, जसे की जास्त चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स यांचे सेवन कमी करणेही गरजेचे आहे. हे पदार्थ झोपेच्या पद्धतीवर परिणाम करतात आणि मायग्रेनचा त्रास वाढवू शकतात. 

(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)

हेही वाचा: Gold Silver Rate Today: डॉलर मजबूत झाला अन् सोन्यावर दबाव वाढला; तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर तपासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number