गोखले पुलाच्या पाडकामासाठी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी आणि मंगळवारी डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याचा एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गोखले पुलाच्या पाडकामासाठी २१ जानेवारी आणि २४ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ तास अप धीम्या मार्गावर असा साडेचार तासांचा […]

गोखले पुलाच्या पाडकामासाठी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी आणि मंगळवारी डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याचा एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

गोखले पुलाच्या पाडकामासाठी २१ जानेवारी आणि २४ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ तास अप धीम्या मार्गावर असा साडेचार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान रात्री ११.३०, ११.४९, १२.०५ पहाटे ३.२५ ची विरार-चर्चगेट लोकल, रात्री ११.१०, १२.१०, पहाटे ३.५०, ४.०५, ४.१०, ४.१५, ४.२०, ४.२५ ची बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप जलद मार्गांवरून चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे रात्री ११.४० वाजता सुटणारी विरार ते चर्चगेट आणि रात्री १२.४६ ची अंधेरी ते भाईंदर लोकल दोन्ही दिशांना गोरेगाव-अंधेरी दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे.

मेल- एक्स्प्रेस गाड्यावर परिणाम

मेगाब्लॉकमुळे रेल्वे क्रमांक २२९२३ वांद्रे टर्मिनस-जामनगर हमसफर एक्सप्रेस, रेल्वे क्रमांक २२९६५ वांद्रे टर्मिनस-भगत की कोठी एक्स्प्रेस, रेल्वे क्रमांक १९००३ वांद्रे टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्स्प्रेसला सांताक्रूझ ते बोरिवलीपर्यंत पाचव्या मार्गिकेवरून चालविण्यात येणार आहे. बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्मऐवजी आठवर थांबतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number