‘शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणारच’  – ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ‘शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणारच’ असं ते म्हणाले.  ‘तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरात झालेल्या प्रचार सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही’ असंही ते यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

‘शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणारच’  – ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ‘शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणारच’ असं ते म्हणाले.  ‘तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरात झालेल्या प्रचार सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही’ असंही ते यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शनिवारी रात्री कोल्हापुर वासीयांशी संवाद साधला. या सभेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तर दिसले पण त्यांच्या फोटो शेजारी सोनिया गांधी आणि काँग्रेसचा पंजाही दिसला’, अशी टीका केली. भाजपच्या या प्रचार सभेला उत्तर देताना , ‘तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही’ ,’सत्तेचा लोभ आम्हाला नाही’ तसेच ‘खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही’ असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.’आमच्या हक्काचा जीएसटी केंद्रानं दिला नाही’ हे ही मुख्यामंत्रांनी नमूद केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number