शक्ती विधेयकाला विधानपरिषदेत मंजूरी देण्यात आली आहे. शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली आहे. महिला सुरक्षेसाठी शक्ती विधेयकास सत्ताधारी आणि विरोधकांनी बहुमताने मंजूरी दिली आहे.
महिलांवरील अत्याचाराविरोधात शक्ती कायद्याचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला होता. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही सभागृहातील मंजुरीनतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर या कायद्यावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात शक्ती विधेयक कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.