व्हिडीओकॉन – आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. बँक कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हायकोर्टाने कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.
“चंदा आणि दीपक कोचर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजच चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची सुटका होईल,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाच्या निर्णयानंतर दिली आहे. लाखाच्या जामिनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. कोचर दाम्पत्यासाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयला कोर्टाकडून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉनला सहा मोठी कर्जे दिली होती. 2019 मध्ये या कर्जासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात येऊन तपास सुरु करण्यात आला होता. ईडीने या प्रकरणी कोचर दाम्पत्यासह पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणूगोपाळ धूत यांच्यासह अन्य आरोपींना अटक केली होती. त्यावेळीही विशेष न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी याच प्रकरणात सीबीआयने पुन्हा एकदा कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाळ धूत यांना अटक केली