टीव्ही जगातील सुप्रसिद्ध जोडपं करण मेहरा आणि निशा रावल यांच्या संबंधात कटुता आली आहे. काही दिवसांपूर्वी अशा अफवा येऊ लागल्या की दोघांमध्ये अनेक वाद आहेत.मात्र आमच्यात सर्व काही ठीक आहे असं करणनं सांगितलं होतं. मात्र आता दोघांमधील वाद प्रचंड वाढला आहे. सोमवारी रात्री निशा रावलनं करण मेहरा याच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. आता निशा रावलनं या प्रकरणी आपली बाजू मांडली असून करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचं तिनं उघड केलं आहे. तसेच निशाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ‘माझं करणसोबत अनेक वर्षांपासून नातं आहे. आज आपण अशाप्रकारे भेटत आहोत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी फक्त इथं आली आहे. कारण माझा मुलगा मोठा झाल्यावर त्यानं या सर्व चुकीच्या बातम्या वाचाव्यात असं मला वाटत नाही. पुढे ती म्हणली या 14 वर्षांच्या नात्यात बरंच काही घडलं आहे कोणालाही आमच्या नावाबद्दल काही माहिती नाही.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा आमच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाल्या तेव्हा करण चंदीगडमध्ये होता. करण मेहराचे विवाहबाह्य संबंध चालू आहेत हे खरं आहे. मला हे सांगताना दुःख होतय की करणचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत, ज्याची मला कल्पना नव्हती. जेव्हा मी त्याला पुरावा दाखविला तेव्हा त्यानं हे मान्य केलं की हो, माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे निशा पुढे म्हणाली की- मी या नात्याची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर होतं की हो, मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याबरोबर माझे शारीरिक संबंधही आहेत. ती मुलगी दिल्लीची आहे. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. काय प्रतिक्रिया द्यावी ते मला समज नव्हतं. मी त्याच्याशी भांडणं करण्याऐवजी प्रेमाने बोलले. दुसर्याच दिवशी मी फ्लाइट घेऊन वडिलांकडे गेली, ते म्हणाला की जे काही आहे ते तुम्ही यावर काम करा. मी म्हणाले जर करण सॉरी म्हणत असेल तर मी त्यावर काम करेल. त्यानंतरही करणच्या वृत्तीत कोणताही बदल झाला नाही. मी एक व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तयार केला आहे ज्यात करण आणि मी दोघंच आहोत. त्याला लव्ह प्रोजेक्ट असंही नाव दिलं कारण मला हे सगळं ठीक करायचं होतं. यापूर्वी करण मेहरानं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं होतं की- लग्नाच्या इतक्या वर्षानंतर हे घडणं वाईट आहे. आम्ही गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. निशा आणि तिच्या भावानं मला जास्त पैसे मागीतले जे मला देणं शक्य नव्हते. करण पुढे म्हणाला की जेव्हा मी याबद्दल बोलायला गेलो तेव्हा निशानं माझ्या पालकांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. ती जोरात ओरडू लागली. ती माझ्यावर थुंकली आणि मला धमकावले असं करणने सांगितले.