अखेर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्धबंदी

पूर्व जेरुसलेम शहरात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. ७ मे रोजी अल-अक्सा मशिदीजवळ ज्यू आणि अरब यांच्यात चकमक झाली. त्यानंतर दोनच दिवसात १० मे पासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायलने पवित्र ठिकाणावरून माघारी जावं, असं आवाहन करत हमासने रॉकेट हल्ल्याला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले […]

अखेर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्धबंदी

पूर्व जेरुसलेम शहरात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. ७ मे रोजी अल-अक्सा मशिदीजवळ ज्यू आणि अरब यांच्यात चकमक झाली. त्यानंतर दोनच दिवसात १० मे पासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायलने पवित्र ठिकाणावरून माघारी जावं, असं आवाहन करत हमासने रॉकेट हल्ल्याला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. गाझापट्टीतून हमासच्या लोकांनी इस्रायलवर ४००० रॉकेट्स डागल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. यातले ५०० हून अधिक रॉकेट्स गाझापट्टीतच कोसळले तर इस्रायलमध्ये आलेल्या रॉकेट्सपैकी ९०% रॉकेट्स क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने पाडल्याचं इस्रायलने सांगितलं.

तब्बल ११ दिवसांच्या हिंसक संघर्षानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अखेर युद्धबंदी झाली आहे. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी दोन वाजता युद्धबंदी लागू झाली. हमासच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून ‘परस्पर आणि एकाचवेळी’ युद्धबंदी लागू होणार असल्याचं स्पष्ट केलंय.

इस्रायलच्या आयर्न डोम या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने हमासचे हजारो रॉकेट्स निकामी केले. अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी मिळून ही यंत्रणा विकसित केली होती. अगणित इस्रायली ज्यू आणि अरब नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आणि दोन्ही देशांनी मिळून तयार केलेल्या आयर्न डोम यंत्रणेचं नेत्यानाहू यांनी कौतुक केल्याचंही बायडन म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number