विजय वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान

काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार याच्याकडून शिवजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यातयेत आहे. विजय वडेट्टीवार यांनी मूर्तीवर चढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वडेट्टीवार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला  हार घालतानाचा व्हिडिओ भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये […]

विजय वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान

काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार याच्याकडून शिवजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यातयेत आहे. विजय वडेट्टीवार यांनी मूर्तीवर चढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वडेट्टीवार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

विजय वडेट्टीवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला  हार घालतानाचा व्हिडिओ भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भागावर पाय ठेऊन उभे होते. त्यामुळे आता या घटनेमुळे वडेट्टीवार यांच्यावर ठाकरे सरकार कारवाई करणार का, असा सवाल विरोधक करत आहे.

मात्र यावर, छत्रपती शिवाजी महाराज यांना हार कसा घातला, यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. परंतु भाजपमधील नेते याप्रकरणी माझे नाव बदनाम करत आहे. तसेच मातृ संघामध्ये ज्यांनी ५० वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number