Ind VS Pak : पाकिस्तानबरोबरच्या सामन्याआधीच भारतीय संघातील तीन खेळाडूंना गंभीर दुखापत, चिंता वाढली

भारतीय संघातील काही खेळांडूना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. 

Ind VS Pak : पाकिस्तानबरोबरच्या सामन्याआधीच भारतीय संघातील तीन खेळाडूंना गंभीर दुखापत, चिंता वाढली

आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. 28 तारखेला दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघातील काही खेळांडूना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. 

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाल्याचे समोर आले आहे.वृत्तानुसार, श्रीलंकेच्या डावातील पहिले षटक टाकल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला. अभिषेक शर्माने हात दुखण्याची तक्रार केली आणि श्रीलंकेच्या डावाच्या मध्यभागी मैदान सोडले.तिलक वर्मा यांच्या स्नायूंच्या दुखापतीबद्दल माहिती मिळाली. सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळाडूंच्या दुखापतींबद्दल अपडेट दिले.

हेही वाचा – India VS Pakistan Cricket Final Match : भारत-पाकिस्तान अंतिम सामना, जाणून घ्या सविस्तरपणे 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाले की, त्यांच्या अनेक खेळाडूंना सामन्यादरम्यान पेटके आले. "पण आम्हाला आशा आहे की पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी ते पूर्णपणे बरे होतील," तो म्हणाला. "आणि ते पूर्णपणे तंदुरुस्त होऊन अंतिम फेरीत प्रवेश करतील."

हेही वाचा – Asia Cup 2025 : अंतिम सामन्यापूर्वी भारताची श्रीलंकेशी लढत! India vs Sri Lanka सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत झळकावले अर्धशतक 

श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापत झाली हे स्पष्ट आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी हे सर्व खेळाडू तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता आहे.मॉर्केलच्या मते, या खेळाडूंना पेटके आले होते, ज्यातून अभिषेक शर्मा बरा झाला आहे. हार्दिक पांड्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो देखील अंतिम सामन्यापूर्वी बरा होण्याची अपेक्षा आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number