पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील लोहगावात सराफाला चोरट्यांकडून कोयत्याचा धाक दाखवून ७३ हजारांचे दागिने लुटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोहगावात चोरट्यांकडून झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत होत आहे. हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे चोरटे पुण्यात सक्रीय झाले आहेत. पुण्यातील लोहगावात सराफ व्यवसायकाला गळ्याला कोयता लावून लुटले आहे. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून ७३ हाजारांचे दागिने चोरट्यांनी चोरले आहेत. ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर संबंधित व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.