इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये आजचा सामना पंजाब किंग्ससाठी अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्ले-ऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी पंजाबला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं होत. अशातच हा सामना आपल्या नावे करून पंजाबने रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा सावरली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर लखनौने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमवून पंजाबसमोर 197 धावांचे आव्हान ठेवले.
यावेळी लखनौकडून प्रथम फलंदाजी करत जोश इंग्लिसने 72 धावांची खेळी खेळत लखनौची सुरुवात मजबूत केली. तसेच आयुष बडोनी याने 43 आणि अब्दुल समद याने 37 धावसंख्या उभारली. इंग्लिस आणि ऋषभ पंत (26) यांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. तसेच गोलंदाजांमध्ये अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला पायचीत केलं तर तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शामीने 2 गडी बाद केले. अशाप्रकारे लखनौने 20 षटकांत 6 बाद 196 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाबसमोर 197 धावांचे आव्हान दिले.
लखनौने दिलेल्या आव्हानाला पुर्ण करण्यासाठी पंजाबकडून प्रियांश आर्यला आपलं खात खोलता आलं नाही. त्यानंतर कूपर कोन्नोली 18 धावा केल्या अशा प्रकारे पंजाब किंग्सने दोन विकेट झटपट गमावल्या. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने 39 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 69 तर श्रेयस अय्यरने 51 चेंडूंत 11 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 101 धावा फटकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी डाव सावरला. त्यानंतर सुयंश शेडगे 9 धावांवर नाबाद राहिला. तर गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल आणि मार्को जानसेन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर अमतुल्लाह ओमरझाई याने एक विकेट घेतली. पंजाब किंग्सने सलग सहा पराभवानंतर विजयाची चव चाखली आहे. या विजयासह पंजाबने 15 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.