मनसेच्या हनुमान चालीसा पठनाला आता राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तारीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीकडून शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ परिसरातील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरात इफ्तारीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करून, त्यांच्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन करावे. हिंदूच्या आस्थेवर घाला घालू नका. तसेच हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करता तर मशिदीत हुनमान चालीसा लावून दाखवा, असा इशारा भाजपाने दिला आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यात उपस्थित राहणार आहेत. उद्या त्यांच्या हस्ते, पुण्यात हनुमानाची सामुहिक महाआरती होणार आहे. कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिरात सायंकाळी हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करण्यात येणार आहे.