‘बाळासाहेब असते तर संजय राऊत यांच्या थोबाडीत मारली असती’ – चंद्रकांत पाटील

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती, नांदेड व मालेगावात आंदोलनाला हिंसक वळण लागेल आहे. त्यामुळे या प्रकरणाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेब असते तर संजय राऊत यांच्या थोबाडीत मारली असती’, अशी टीका चंद्रकांत पाटील […]

‘बाळासाहेब असते तर संजय राऊत यांच्या थोबाडीत मारली असती’ – चंद्रकांत पाटील

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती, नांदेड व मालेगावात आंदोलनाला हिंसक वळण लागेल आहे. त्यामुळे या प्रकरणाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेब असते तर संजय राऊत यांच्या थोबाडीत मारली असती’, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

  संजय राऊतांनी केलेल्या वकत्व्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकून कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती’, असे ते म्हणाले.

  ‘प्रत्येक प्रकरणात यांना भाजपचा हात दिसतो. एसटी संप आम्ही सुरू केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्ही फोडला. सर्व आम्हीच केले. अरे चाललंय काय? लोकांना कळत नाही का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

  त्रिपुरातील घटनेचा निषेध अमरावतीत करायला हरकत नाही. लोकशाहीत अधिकार आहे, परंतु शांततेत करा. अमरावतीमधील हिंसाचाराचा खरा अहवाल पोलिसांना द्यावा. सर्वसामान्यांना त्रास झाला त्याच्या निषेधार्थ भाजपने बंद पुकारला तर यात काय चुकलं? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊतांचा आरोप

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे महाराष्ट्रात जे पडसाद उमटले आहेत त्या प्रकरणाला भाजप जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. रझा अकादमी नावाची जी संघटना वातावरण बिघडवत आहे ती संघटना भाजपची सिस्टर कन्सर्न आहे. राज्यसरकार अस्थिर करण्यासाठी भाजप हा सगळा खेळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number