‘मला बळजबरीने बोलायला लावले’

अद्वय हिरे यांनी भाजपात असताना समाजमाध्यमांवर शिवसेनेविरोधात पोस्ट केली होती. याबद्दल उद्धव गटातील प्रवेशावेळी त्यांनी खुलासा केला आहे. शुक्रवारी, २७ जानेवारी २०२३ रोजी भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांनी सेनाभवन येथे उद्धव गटात प्रवेश केला. यावेळी भाषण करताना ‘त्यावेळी जे बोललो ते बळजबरीने बोलायला लावले होते’, असे अद्वय हिरे यांनी पूर्वी शिवसेनेविरोधात केलेल्या पोस्टवर म्हटले आहे. […]

‘मला बळजबरीने बोलायला लावले’

अद्वय हिरे यांनी भाजपात असताना समाजमाध्यमांवर शिवसेनेविरोधात पोस्ट केली होती. याबद्दल उद्धव गटातील प्रवेशावेळी त्यांनी खुलासा केला आहे.

शुक्रवारी, २७ जानेवारी २०२३ रोजी भाजपा बंडखोर अद्वय हिरे यांनी सेनाभवन येथे उद्धव गटात प्रवेश केला. यावेळी भाषण करताना ‘त्यावेळी जे बोललो ते बळजबरीने बोलायला लावले होते’, असे अद्वय हिरे यांनी पूर्वी शिवसेनेविरोधात केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

‘भाजपात सगळं स्क्रिप्टेड असतं, सोशल मिडियावर काय टाकायचे तेही वरुन सांगितले जाते’, असेही ते यावेळी म्हटले.

अद्वय हिरे यांनी शिवसेनेच्या विचारांशी औरंगजेब आणि ओवेसीच्या विचारांशी तुलना करणारी, उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका करणारी फेसबुक पोस्ट केली होती. तसेच शिवसेनेचा चिवसेना म्हणून उल्लेख करणारी आणि संजय राऊत यांना हरामखोर असे म्हणणारी पोस्ट केली होती. त्यामुळे आता उद्धव गटात प्रवेशानंतर अद्वय हिरे यांनी पूर्वी शिवसेनेविरोधात पोस्ट केलेल्या मिम्स, विरोधी पक्षाकडून वायरल केल्या जात आहेत.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number