घटस्फोटानंतर पोटगी किती द्यायची हे कसं ठरवलं जातं? कोणत्या परिस्थितीत पतीही असू शकतो पोटगीला पात्र?

भारतात पोटगी विविध कायद्यांतर्गत निश्चित केली जाते. यामध्ये हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, भारतीय घटस्फोट अधिनियम, मुस्लीम महिला अधिनियम आणि पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम यांचा सहभाग आहे.

घटस्फोटानंतर पोटगी किती द्यायची हे कसं ठरवलं जातं? कोणत्या परिस्थितीत पतीही असू शकतो पोटगीला पात्र?

Alimony After Divorce : घटस्फोटानंतर पोटगीचा (alimony) नियम म्हणजे, घटस्फोटानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या जोडीदाराला (विशेषतः पत्नीला) आर्थिक मदत किंवा देखभाल खर्च (maintenance) पुरवण्याची कायद्याची तरतूद आहे. ही रक्कम कोर्टाद्वारे ठरवली जाते. गेल्या काही काळात घटस्फोटाचे अनेक हाय-प्रोफाइल केसेस पहायला मिळाले. सध्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट चर्चेत आहे. याआधी इतरही अनेक सेलिब्रिटींच्या पोटगीच्या रकमेची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होतती. काहींच्या बाबतीत ही रक्कम 100 कोटींच्या घरात असल्याचंही ऐकायला मिळतं. घटस्फोटानंतर पोटगीची ही रक्कम कशी ठरवली जाते, ते जाणून घेऊ..

पोटगी (Alimony) म्हणजे काय?
– घटस्फोटाच्या वेळी किंवा नंतर, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या जोडीदाराला (पत्नी किंवा पती) आर्थिक मदत किंवा देखभाल पुरवणे म्हणजे पोटगी. 
– पोटगीचा उद्देश आहे, घटस्फोटानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीला स्वतःचे जीवनमान टिकवून ठेवता यावे. 
– पोटगीचा निर्णय घेताना, दोन्ही पक्षांची आर्थिक क्षमता, मालमत्ता, उत्पन्न, आणि इतर आवश्यक गोष्टींचा विचार केला जातो. 
– पोटगीची रक्कम आणि कालावधी कोर्टाद्वारे ठरवला जातो. 

हेही वाचा – डोक्याला टक्कल पडू लागलंय? केस गळणं थांबवण्यासाठी आवळ्याचा असा करा उपयोग; नवे केसही येऊ लागतील

भारतात पोटगी विविध कायद्यांतर्गत निश्चित केली जाते. यामध्ये हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, भारतीय घटस्फोट अधिनियम, मुस्लीम महिला अधिनियम आणि पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम यांचा सहभाग आहे. पोटगीची रक्कम निश्चित करण्यापूर्वी न्यायालयाकडून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जातो. पती-पत्नीची आर्थिक स्थिती, लग्नादरम्यान त्यांचं राहणीमान, लग्नाचा अवधी आणि मुलांच्या संगोपनाची व्यवस्था.. या सर्वांचा विचार न्यायालयाकडून केला जातो.

भारतीय कायद्यानुसार, आर्थिक दृष्टीने कमकुवत पती किंवा पत्नीला अधिक कमावणाऱ्या पती किंवा पत्नीकडून आर्थिक मदत घेण्याचा अधिकार आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये ही मदत पत्नीलाच मिळते.
यामध्ये दोन प्रकारची आर्थिक मदत असते. अधिक कमावणारा पती किंवा पत्नी सर्वसाधारणपणे दुसऱ्या जोडीदाराला ही आर्थिक मदत करते. इंटरिम मेंटेनन्स म्हणजेच कोर्टातील प्रकरण लांबवल्यादरम्यान ही रक्कम दिली जाते. दुसरा प्रकार हा स्थायी पोटगीचा (permanant alimony) आहे. घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत ही आर्थिक द्यावी लागू शकते.

हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 24 आणि 25 अंतर्गत अंतरिम आणि स्थायी पोटगी किंवा भत्ता दिला जातो." यात पती-पत्नी आपापसांत चर्चा करून पोटगीची रक्कम ठरवू शकतात. परंतु दोघांमध्ये रकमेवरून मतभेद असल्यास पोटगीची रक्कम कोर्टाकडून निश्चित केली जाते. पोटगीचा दावा करण्यासाठी पत्नीला तिच्या उत्पन्न आणि संपत्तीचे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागतात. त्याचसोबत मासिक खर्चसुद्धा कोर्टासमोर सांगावा लागतो.

हेही वाचा – Blood Donation : रक्तदान केल्याने होतात 'हे' अगणित जादुई फायदे; नव्या संशोधनाने समोर आणली ही खास बाब

पोटगीची रक्कम कशी ठरवली जाते?
– दोनही पक्षांची आर्थिक क्षमता: दोन्ही पक्षांची कमाई, मालमत्ता, खर्च, आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो. 
– जोडीदाराची गरज: पत्नी किंवा पतीला पोटगीसाठी किती गरज आहे, हे पाहिले जाते. 
– मुलांचे पालनपोषण: जर मुले असतील, तर त्यांच्या पालन-पोषणासाठी पोटगीची रक्कम विचारात घेतली जाते. 
– जोडीदाराचे वय आणि आरोग्य: जोडीदाराचे वय, आरोग्य आणि भविष्यात काम करण्याची क्षमता यांचाही विचार केला जातो. 

प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितीच्या आधारे न्यायालयाला पती आणि पत्नी अशा दोघांच्या संपत्तीच्या वितरणावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये स्त्रीधन, संयुक्त संपत्ती आणि इतर संपत्तींचा समावेश असतो, जी दाम्पत्याकडे लग्नाच्या आधी आणि संसारादरम्यान असते.

(Disclaimer : ही बातमी केवळ सामान्य माहितीवर आधारित असून यामध्ये सविस्तर माहिती प्रदान केलेली नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायदेतज्ज्ञाचा सल्ला घ्या. जय महाराष्ट्र यासंबंधी कोणतीही जबाबदारी घेत नाही. )

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number