मुंबई: दिवाळीजवळ आली म्हटलं की लोक घर स्वच्छ करायला सुरुवात करतात. या काळात अनेक घरांमध्ये झुरळे पाहायला मिळतात. मात्र ही एक समस्या झाली आहे. जर तुम्हालाही झुरळांचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला पाच सोप्या सांगणार आहोत. या दिवाळीत तुमच्या घरी झुरळं दिसणार नाहीत.
तुमचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी झुरळांपासून मुक्तता मिळवणे महत्त्वाचे आहे. झुरळे ही जवळजवळ प्रत्येक घरात एक सामान्य समस्या आहे. कडुलिंब-कापूर, व्हिनेगर-लिंबू, बोरिक पावडर, ड्रेनेज साफ करणे आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता तुमच्या घराला झुरळमुक्त ठेवेल. या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही आनंदाने दिवाळी साजरी करू शकता आणि वर्षभर झुरळांपासून मुक्त राहू शकता.
झुरळं घालवण्यासाठी वापरा ही युक्ती
पूर्वीच्या काळापासून चालत आलेला हा उपाय प्रभावी आहे. वाळलेल्या कडुलिंबाच्या पानांची आणि कापूरची पावडर बनवा. ती घराच्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरातील सिंकमध्ये आणि बाथरूममध्ये शिंपडा. कडुलिंब आणि कापूरचा वास झुरळांना दूर ठेवतो. हे मिश्रण विशेषतः झुरळे वारंवार आढळणाऱ्या ठिकाणी वापरा. हा नैसर्गिक उपाय प्रभावी आहे.
हेही वाचा: PCOS Symptoms: पीसीओएस म्हणजे काय?, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
व्हिनेगर आणि लिंबू वापरून स्वच्छता करा
दिवाळीच्या स्वच्छतेवेळी जमिनी आणि पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा. झुरळांना या मिश्रणाचा वास आवडत नाही, ज्यामुळे ते पळून जातात. हा उपाय झुरळांना दूर ठेवतो.
तुम्ही बोरिक पावडर देखील वापरू शकता..
बाजारात सहज उपलब्ध असलेली बोरिक पावडर झुरळांना दूर करण्याचा फायदेशीर आहे. बोरिक पावडर पीठ किंवा साखरेमध्ये मिसळा आणि झुरळे वारंवार येतात अशा ठिकाणी ठेवा. झुरळे खाल्ल्यानंतर लगेच मरतात. हा उपाय करताना काळजी घ्या. तसेच मुलांना आणि पाळीव प्राण्यांना त्यापासून दूर ठेवा.
स्वच्छ पाईप्स आणि ड्रेनेज सिस्टम
स्वयंपाकघर आणि बाथरूम सिंक आणि ड्रेनेज पाईप्स हे झुरळांसाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ते गरम पाण्याने आणि जंतुनाशकांनी नियमितपणे स्वच्छ करा. गरम पाण्याने झुरळं आणि त्यांची अंडी मरतात. ड्रेनेज सिस्टीम स्वच्छ केल्याने झुरळे आत जाण्यापासून रोखली जातात.