काश्मीर प्रश्नावर शुक्रवारी गृहमंत्रालयाची बैठक बोलवण्यात आली आहे. सातत्याने होणाऱ्या हत्यांबाबत बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादी हल्ला आणि खोऱ्यातील सुरक्षेबाबत ही बैठक बोलावली आहे.टार्गेटेड किलिंगमुळे बिघडणारी परिस्थिती सांभाळण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी आता पुढाकार घेतला आहे.या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या २२ दिवसांत ८ टार्गेटेड किलिंग करुन दहशतवाद्यांनी खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. टार्गेटेड किलिंगबाबत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत गृह मंत्रालयाकडून मोठा निर्णय येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.काश्मिरी पंडित आणि इतर नागरिकांवर होत असणाऱ्या हल्ल्यांबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. . दिल्लीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी सहभागी होतील. गुरुवारी अमित शहा यांनी डोवाल आणि रॉ प्रमुखांसोबत यांच्या सोबत देखील चर्चा केली होती. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत मागील १५ दिवसांमधली ही दुसरी बैठक आहे. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला डोवालही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.