यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिल महिन्यातील रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २ मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहिल तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या झळी कोसळल्या. यावेळी तेथील तापमान ४६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये मध्यम श्रेणीत उष्णता नोंदवण्यात आली.
📢Some Relief :
From 1st May,temperatures are very likely to start falling a little in Northern India, the current heat wave regions in coming 2,3 days as per the model guidance from @ncmrwfmoes and IMD.
Watch for updates please. pic.twitter.com/b5l6YPcofe — K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 30, 2022