देशमुख, मलिकांच्या मतदान अर्जावर गुरुवारी सुनावणी

विधानपरिषदेच्या मतदानाकरिता कोठडीत असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, देशमुख आणि मलिकांच्या याचिकेवर बुधवारी होणारी सुनावणी रद्द झाली असून आता, देशमुख, मलिकांच्या मतदान अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मलिकांनी याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आता […]

देशमुख, मलिकांच्या मतदान अर्जावर गुरुवारी सुनावणी

विधानपरिषदेच्या मतदानाकरिता कोठडीत असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, देशमुख आणि मलिकांच्या याचिकेवर बुधवारी होणारी सुनावणी रद्द झाली असून आता, देशमुख, मलिकांच्या मतदान अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मलिकांनी याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आता २० जून रोजी विधानपरिषद निवडणुका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अटकेत असलेल्या देशमुख आणि मलिकांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी याचिका होणार आहे.

दहशतवादी दाऊद इब्राहिमसोबत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अटकेत आहेत. तसेच आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ईडीने अटक केली आहे. या दोन्ही नेत्यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी याचिका केली आहे. या याचिकेवर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number