Remedies for Cold and Cough | पावसाळा सुरू होताच सर्दी, खोकला, ताप आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्या अनेकांना त्रास द्यायला लागतात. पावसाळ्यात अनेक आजार वाढायला ही सुरुवात होते. अशावेळी अनेकजण घरगुती उपायांचा आधार घेतात. बहुतांश लोक घरच्या घरी काय उपाय करता येईल याचा विचार करत असतात. अशातच घसा दुखणे, सर्दी-खोकल्यावर आल्याचा चहा आणि आल्याचा काढा हे दोन पर्याय सर्वाधिक पसंत केले जातात. पण या दोघांपैकी नेमके काय अधिक फायदेशीर ठरते? चला जाणून घेऊया…
आल्याचा चहा
गरमागरम आल्याचा चहा घशाला आराम देतो. नाक बंद होण्याची समस्या कमी होते, त्याचबरोबर शरीराला उब मिळते. सौम्य सर्दी किंवा घशात खवखवत असल्यास आल्याचा चहा हा चांगला पर्याय ठरू शकतो.
आल्याचा काढा
आल्यासोबत तुळस, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हळद यांसारखे घटक घालून काढा तयार केला जातो. हा रोगप्रतिकारक वाढवण्यास मदत करतो. सर्दी-खोकल्याची लक्षणे अधिक असल्यास काढा फायदेशीर ठरतो. मात्र त्याचे अतिसेवन टाळावे अन्यथा पोटात जळजळ होऊ शकते.
कोणता पर्याय निवडावा?
सौम्य सर्दी किंवा घशात खवखवत असल्यास आल्याचा चहा पुरेसा ठरू शकतो. पण सर्दी-खोकल्याची लक्षणे जास्त असल्यास आल्याचा काढा अधिक फायदेशीर ठरू शकतो.
आल्याचा चहा आणि काढा हे दोन्ही घरगुती उपाय सर्दी-खोकल्याच्या लक्षणांमध्ये काही प्रमाणात आराम देऊ शकतात. मात्र, ताप किंवा सर्दी – खोकला दीर्घकाळ असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)