Heart Health: हेल्दी समजून रोज खाताय हे 5 पदार्थ? हृदयासाठी आहेत अत्यंत घातक; जाणून घ्या

हेल्दी समजून आपण दररोज खात असलेल्या काही पदार्थांमुळे हृदयाला धोका वाढू शकतो.

Heart Health: हेल्दी समजून रोज खाताय हे 5 पदार्थ? हृदयासाठी आहेत अत्यंत घातक; जाणून घ्या

Heart Health:आपल्या दैनंदिन आहारात अनेक पदार्थ असे असतात जे दिसायला हेल्दी वाटतात. अनेकांना वाटतं की नैसर्गिक, फळे-भाज्या किंवा कमी फॅट असलेले पदार्थ म्हणजे शरीरासाठी सुरक्षित. मात्र, हृदयरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही अशी खाद्यपदार्थ आहेत जे हेल्दी टॅग घेऊन येतात, पण हृदयाच्या आरोग्यावर त्यांचा दुष्परिणाम चुपचाप होत राहतो. विशेषतः किडनीची समस्या असणारे, बीपीचे रुग्ण, काही विशिष्ट औषधे घेणारे आणि हार्टच्या आजाराचा धोका असलेल्यांनी याबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

चला, जाणून घेऊया अशा 5 पदार्थांची माहिती जे अनेकदा आपण आरोग्यदायी समजून खातो, पण हृदयावर त्यांचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

1) केळे: पोटॅशियमचा ‘ओव्हरडोस’ हानीकारक

केळे पौष्टिक फळ मानले जाते, पण त्यातील पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. किडनी नीट काम करत नसल्यास किंवा काही विशिष्ट औषधांमुळे पोटॅशियम वाढत असेल, तर शरीरात हा घटक धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकतो. जास्त पोटॅशियममुळे हृदयाची धडधड अनियमित होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी केळ्याचे सेवन मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक.

2) ग्रेपफ्रूट: औषधांवर विपरीत परिणाम

ग्रेपफ्रूट व्हिटॅमिन C ने भरपूर असले तरी ते यकृतात औषधांचे विघटन करण्याची प्रक्रिया मंदावते.त्यामुळे काही औषधांचा प्रभाव शरीरात गरजेपेक्षा जास्त वाढू शकतो.हार्ट ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना, किंवा हृदयाशी संबंधित औषधे घेणाऱ्यांना यामुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

3) पालक: ब्लड थिनर औषधांवर परिणाम

पालक अत्यंत हेल्दी आहे, पण यात व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात असते.हे घटक वॉरफरिनसारख्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या परिणामात बदल करू शकतात.समस्येचा मुख्य मुद्दा म्हणजे पालकाचे सेवन अचानक खूप वाढवणे किंवा अचानक कमी करणे. संतुलित सेवन केल्यास तो सुरक्षित आहे.

4) सोया सॉस: अती मीठामुळे पाणी साठणे

सोया सॉसमध्ये सोडियमचे प्रमाण अत्यंत जास्त असते. जास्त मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे सूज, वजन वाढणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हार्ट फेल्युअर किंवा बीपी असलेल्या रुग्णांनी तर सोया सॉस टाळणेच उत्तम.

5) मुलेठी: रक्तदाब वाढवू शकते

खूप लोक मुलेठी चहात किंवा काढ्यात वापरतात. खरी मुलेठी शरीरातील पोटॅशियम कमी करते आणि ब्लड प्रेशर वाढवते. मुलेठी असलेले ड्रिंक्स किंवा सप्लीमेंट्स नियमित घेतल्यास हृदयावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

(Disclaimer :  ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number