समृद्धी महामार्गावर अपघातात पहिला बळी

समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामागावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघात घडला असून पहिला बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असताना या महामार्गावर वाहतुकीस परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. रविवारी सायंकाळी औरंगाबादहून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे येताना मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भरधाव वाहनामधील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे […]

समृद्धी महामार्गावर अपघातात पहिला बळी

समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामागावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघात घडला असून पहिला बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असताना या महामार्गावर वाहतुकीस परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

रविवारी सायंकाळी औरंगाबादहून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे येताना मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भरधाव वाहनामधील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहनाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. बळीराम खोकले असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमींना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी छोटे मोठे काम बाकी तुकडे जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गवरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. या महामार्गावर वाहनांची रहदारी कमी असल्यामुळे वाहनचालक वेगाने वाहने चालवत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे या महामार्गाचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले.

महामार्गाचे काम पूर्ण नसताना या महामार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. तर चालक सुसाट वाहने चालवत आहे. अशातच रविवारी या महामार्गावर झालेल्या वाहनाच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे या महामार्गावर प्रवास करणे धोक्याचे असल्याचे ‘जय महाराष्ट्र’ वृत्त वाहिनीकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number