नागपुरात हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात गुन्हा दाखल

विकास फाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर विद्यार्थी भडकले असून राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ऑफलाईन परिक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवाहन देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात नागपुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी भाऊ यांनी आंदोलन करण्याचे आवाहन दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले. तर नागपूर […]

नागपुरात हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात गुन्हा दाखल

विकास फाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर विद्यार्थी भडकले असून राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ऑफलाईन परिक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवाहन देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात नागपुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी भाऊ यांनी आंदोलन करण्याचे आवाहन दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले. तर नागपूर विद्यार्थ्यांनी अजनी पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केले तर अनेक ठिकाणी तोडफोट केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या गुन्ह्यांच्या तपासामध्ये विद्यार्थ्यांना चिथवण्यामध्ये हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे समोर आले. त्यामुळे विना परवानगी गर्दी करणे, आंदोलन करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, दंगल करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे या आरोपांमध्ये हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गरज भासली तर हिंदुस्थानी भाऊल ताब्यात घेऊ, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

‘हिंदुस्थानी भाऊ’चे आवाहन, आंदोलन भडकले

हिंदुस्थानी भाऊ नावाच्या अधिकृत अकाऊंटवरून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर आंदोलक विद्यार्थी भडकले असून विद्यार्थी राज्यभरात ऑफलाईन परिक्षांच्याविरोधात रस्त्यावर आले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाले, तर हा हिंदुस्थानी भाऊ कोण आहे?

हिंदुस्थानी भाऊ यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले. परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबाबत खेळ का करतात? असा सवाल हिंदुस्थान भाऊ उर्फ विकास फाटक यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number