पश्चिम बंगालमध्ये बसचा भीषण अपघात

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, बस वेगात येत […]

पश्चिम बंगालमध्ये बसचा भीषण अपघात

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढेच एक रुग्णवाहिका जात आहे. बस रोडच्या खाली उतरुन अचानक उलटती. बस उलटल्यानंतर बसच्या वरती बसलेले प्रवाशी दबले जातात. हा अपघात झाल्यावर परिसरातील लोक तत्काळ मदतीसाठी येतात. बसखालील दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कटवा-बीरभूम राज्य महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा प्रकृती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कटवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, काहींवर उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मृताची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

कसा झाला अपघात पाहुयात

 

पूर्व बर्धमान जिल्ह्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास यांनी सांगितलं की, “या अपघातात ४५ जण जखमी झाले आहेत. चालकाला अटक करण्यात आली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत,” अशी माहिती दास यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number