मुंबईतील अनेक भागात ईडीच्या धाडी

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत दाऊद इब्राहिम संबंधित मुंबईतील एका व्यक्तीविरोधात कारवाई सुरू केली आहे. ईडीने मुंबईतील अनेक भागात धाडी टाकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हीच्या संबंधित मालमत्तांवरही ईडीने धाडी टाकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ईडीने मुंबईतील इतर मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या मालमत्तासंबंधित व्यक्तीचे दाऊद इब्राहिम […]

मुंबईतील अनेक भागात ईडीच्या धाडी

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत दाऊद इब्राहिम संबंधित मुंबईतील एका व्यक्तीविरोधात कारवाई सुरू केली आहे. ईडीने मुंबईतील अनेक भागात धाडी टाकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हीच्या संबंधित मालमत्तांवरही ईडीने धाडी टाकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ईडीने मुंबईतील इतर मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या मालमत्तासंबंधित व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकताच दाखल केलेल्या एफआयआर आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीची कारवाई सुरु असल्याचेही सांगितले जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही पत्रकार परिषद ऐकावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number